डॉ. आंबेडकर समता पंधरवड्यांतर्गत जात वैधता प्रमाणपत्र शिबीरांचे आयोजन - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

08 April 2025

demo-image

डॉ. आंबेडकर समता पंधरवड्यांतर्गत जात वैधता प्रमाणपत्र शिबीरांचे आयोजन

.com/img/a/

रत्नागिरी - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अंतर्गत आयुक्त समाज कल्याण व महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. 1 एप्रिल ते दि. 14 एप्रिलपर्यंत समता पंधरवडा घोषित करण्यात आलेला आहे. 

या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयामार्फत प्रस्ताव स्विकृती व त्रूटीपुर्तता शिबीरांचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी इयत्ता ११ वी / १२ वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी व पालकांनी जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यासाठी योग्य कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव तयार करून आपल्या विद्यार्थ्यांच्या शाळा/ महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या मार्फत समितीस जास्तीत जास्त संख्येत सादर करावेत व या उपक्रमाचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष शंकर बर्गे यांनी केले आहे.
        
तसेच २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व मागासवर्गीय (अनुसूचित जाती (SC), भटक्या जमाती (NT- B, C, D), विमुक्त जाती (VJ- A), इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागासप्रवर्ग (SBC) व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (SEBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी त्वरीत जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव या कार्यालयास सादर करावेत.
       
ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी समितीस प्रस्ताव सादर केले आहेत परंतू अद्याप त्रुटींची पूर्तता केली नसल्याने प्ररकण प्रलंबित आहे, अशा सर्व प्रस्तावधारक यांनी समिती कार्यालयास सर्व आवश्यक मुळ कागदपत्रांसह समक्ष उपस्थित त्रुटींची पुर्तता करावी. जेणेकरून समितीस आपले प्रस्तावावर विहीत कालमर्यादेत कागदोपत्री पुराव्यांच्या गुणवत्तेनुसार निर्णय घेता येईल. असे आवाहनही करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages