मुंबई - अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात राज्य सरकारला हायकोर्टाने मोठा धक्का देत या प्रकरणात पोलिसांवार गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहे. या प्रकरणात अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती मात्र आता हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याने राज्य सरकारला एक मोठा धक्का मानला जात आहे.
अक्षय शिंदे याचा मुंब्रा परिसरात चौकशीसाठी आणताना एन्काऊंटर करण्यात आला होता मात्र हे एन्काऊंटर बनावट असल्याचा तपासात समोर आल्याने पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती मात्र याच्या विरोधात राज्य सरकारने भूमिका घेत जोपर्यंत एसआयटी अहवाल येत नाही तोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही अशी भूमिका सरकारने घेतली होती.
No comments:
Post a Comment