राजापूरातील १०१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

22 April 2025

demo-image

राजापूरातील १०१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

1001193475

रत्नागिरी / राजापूर  - राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतिच्या सरपंच पदाचे आरक्षण मंगळवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात जाहीर झाले. महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षणानुसार सर्वसाधारण  प्रवर्गामध्ये ३५, नागरिकांचा मागास प्रवर्ग गटासाठी १४ आणि दोन ग्रामपंचायती अनुसूचित जाती जमाती असे १०१ पैकी ५१ ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी आरक्षण जाहीर झाले.

दरम्यान तालुक्यातील अनेक मोठया आणि राजकीय दृष्टया महत्वाच्या असलेल्या ग्रामपंचायतिमध्ये महिला सरपंच पदाचे आरक्षण पडल्याने तेथील ग्रामपंचायतिचे स्टेअरिंग महिलांच्या हाती आले आहे तर जाहीर झालेल्या सरपंच पदाच्या आरक्षणाने काहीना लॉटरी लागली तर अपेक्षित आरक्षण न पडल्याने काहीच्या पदरी निराशा पडल्याचे पहावयास मिळाले.

राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहीर झाले. मुंबई, गोवा महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात राजापूरचे तहसीलदार विकास गमरे, नायब तहसीलदार दीपाली पंडीत यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील सरपंच पदांचे आरक्षण जाहीर झाले. त्यावेळी तालुक्यातील विविध राजकीय पक्षांची मंडळी उपस्थित होती.

सर्वप्रथम तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती यांचे आरक्षण काढण्यात आले. तालुक्यात या प्रवर्गाच्या एकूण तीन ग्रामपंचायती असून शासनाच्या नियमानुसार तीन ग्रामपंचायती त्या प्रवर्गासाठी निवडण्यात आल्या. त्यामध्ये कळसवली, केळवली आणि शिवनेबुद्रुक यांचा समावेश होता. पन्नास टक्के आरक्षण धोरणानुसार कळसवली आणि केळवली या दोन ग्रामपंचायती अनुसूचित जाती जमाती या महिला सरपंच पदासाठी आरक्षित झाल्या. तर शिवणे बुद्रुक ही तिसरी ग्रामपंचायत याच प्रवर्गासाठी आरक्षित झाली. नागरिकांचा मागास प्रवर्ग मध्ये एकूण २७ ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित झाल्या. त्यामध्ये आजीवली, हसोळ तर्फे सौन्दळ, जैतापूर, कॊतापूर, नाटे, हातीवले, आंगले, दसूर, चुनाकोळवण, तळगाव, आडवली, मंदरुळ, पांगरे बुद्रुक, सागवे, यांचा समावेश आहे. 

तर नागरिकांचा मागास प्रवर्गमध्ये १३ ग्रामपंचायतिच्या सरपंच पदाचे आरक्षण घोषित झाले असून त्यामध्ये ओशिवळे, धाऊलवल्ली, डोंगर, कोंडये तर्फे सौन्दळ, मोरोशी, सोलगाव, ताम्हाणे, उपळे, वाटुळ, वाल्ये, येळवण,झर्ये, साखरी नाटे या ग्रामपंचायतिचा समावेश आहे.
तालुक्यात ७१ ग्रामपंचायती सर्वसाधारण गटात असून त्यामध्ये ३५ ग्रामपंचायती महिला सरपंच पदासाठी आरक्षित झाल्या. त्यामध्ये
कोंडेवळे, तुळसवडे, ससाळे, गोवळ, भालावली, कोदवली, कुवेशी, देवीहसोळ, जुवाटी, शिवनेखुर्द, पाचल, माडबन,गोठणे दोनीवडे, प्रिंदावन, साखर,वडदहसोळ, हरळ, हातदे, खडी कोळवण, कोळंब, सौन्दळ पांगरीखुर्द, कोंडे तर्फे राजापूर, काजीर्डा, दळे, तेरवण, कारवली,ओझर, रायपाटण, शीळ, करक, धोपेश्वर, राजवाडी, मोसम, शेढे यांचा समावेश होता तर सर्वसाधारण गटासाठी ३६ ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले. त्यामध्ये
अणसुरे , कशेळी, शेजवली, महाळुंगे, खरवते, खिणगिणी,आंबोळगड, ओणी, भू, चिखलगाव, देवाचेगोठणे, दोनीवडे, जुवे जैतापूर, जवळेथर, कुंभवडे, कोंडसर बुद्रुक, मिठगवाणे, मूर, मिळंद, नाणार, निवेली, पडवे, परुळे, पन्हाळे तर्फे सौंदळ, परटवली, पेंडखले, तळवडे, तारळ, वडापेठ, विलये, येरडव, फुफेरे, उन्हाळे, वडवली, कणे्री, मोगरे यांचा समावेश आहे. 

राजापूर तालुक्यातील एकूण १०१ ग्रामपंचायतीमध्ये पन्नास टक्के महिला आरक्षण धोरणानुसार ५१ ग्रामपंचायतिवर महिला सरपंच विराजमान होणार आहेत. त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३५, नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणून १४ आणि दोन अनुसूचित जाती जमाती असा सामावेश असून उर्वरीत ५० ग्रामपंचायटीमध्ये ३६ सर्वसाधारण, १३ नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि एक अनुसूचित जाती जमाती असा सामावेश असणार आहे.

राजापूर तालुक्यातील जाहीर होणाऱ्या १०१ ग्रामपंचायतिच्या सरपंच पदाच्या आरक्षणाकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले होते. मनाजोगे आरक्षण पडावे अशी अनेकांची इच्छा होती. मात्र घोषित झालेल्या सरपंच पदाच्या आरक्षणाने काहीना लॉटरी लागली तर काहीच्या पदरी घोर निराशा पडली. तालुक्यातील काही मोठया ग्रामपंचायतीचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित झाल्याने आता तेथे महिला राज येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages