मुंबई - मुंबईची लाइफलाईन म्हणून ओळख असलेल्या बेस्ट बसच्या आज गुरुवारी दोन ठिकाणी दुर्घटना घडल्या. चर्चगेट रेल्वे स्थानकासमोर बसला आग लागली. तर ठाणे आनंद नगर येथे बसने डिव्हायडरला धडक दिल्याने प्रवाशांना खिडक्यांच्या काचा फोडून बाहेर पडावे लागले. यात दोन प्रवासी जखमी झाले आहेत.
बेस्ट प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री 10 च्या सुमारास बस क्र A-121 (121/31, बस क्रमांक 6267, RTO NO. MH-01-DR-1327, BD 020799 आणि BC 109927) चर्चगेट येथून एमके रोड येथे जे मेहता मार्गाकडे जात होती. चर्चगेट स्थानकासमोर या बसमध्ये बॅटरी विभागात शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली. बसमध्ये एकूण 8 प्रवासी होते. शॉर्ट सर्किट झाल्याने बस ड्रायव्हरला ड्रायव्हर केबिनमध्ये आगीचा वास येत असल्याचे लक्षात आले आणि सर्व प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले मात्र आगीमुळे बसचे नुकसान झाले.
दुसऱ्या दुर्घटनेत मागाठाणे आगाराची बस क्रमांक 8562, A-700 मागाठाणे आगारातून ठाणे स्टेशन पूर्वकडे जात होती. रात्री सुमारे 20:15 वाजता बस आनंद नगर ठाण्यात आली. OLECTRA (Wetlease) च्या 024840 क्रमांकाच्या बस चालकाचे स्टेअरिंगवरील ताबा सुटला आणि बस रोड डिव्हायडरवर धडकली. दुर्घटनेमुळे बसचे दरवाजाचे उघडता आले नाहीत. दरवाजे उघडता न आल्याने बसमधील प्रवासी घाबरले, खिडकीच्या काचा फोडून खिडकीतून बाहेर आले. दुर्घटना घडली त्यावेळी बसमध्ये तीसहून अधिक प्रवासी होते त्यापैकी दोन प्रवासी जखमी झाले.
No comments:
Post a Comment