कोकण रेल्वेच्या काही गाड्या ३० एप्रिलपर्यंत ठाण्यापर्यंतच धावणार - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

23 April 2025

demo-image

कोकण रेल्वेच्या काही गाड्या ३० एप्रिलपर्यंत ठाण्यापर्यंतच धावणार

Express

मुंबई - मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असून त्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वेगाडी ३० एप्रिल पर्यंत सीएसएमटीऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहे. तर याचसोबत जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेस या गाड्या सीएसएमटी ऐवजी दादर पर्यंत धावणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे फलाट विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. फलाट क्रमांक १० आणि ११ चे विस्तारीकरण झाले असून १२, १३ या फलाटांचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर या फलाटावरून २४ डब्यांची रेल्वेगाडी धावू शकेल. सध्या सुरू असलेल्या कामांमुळे या फलाटावर येणाऱ्या रेल्वेगाड्या इतर फलाटावर पाठवण्यात येत आहेत . तेजस, जनशताब्दी यांसारख्या महत्त्वाच्या रेल्वेगाड्या सीएसएमटीऐवजी दादरपर्यंत धावत आहेत. मंगळुरू एक्स्प्रेस सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावते. परिणामी, प्रवाशांना ठाण्यावरून सीएसएमटी गाठण्यासाठी शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रासही सहन करावा लागत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages