बोधगया - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात सलग दुसऱ्या दिवशीही सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांनी आपल्या उपस्थितीची माहिती ट्विटरद्वारे दिली आहे.
महाबोधी विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असून अॅड. आंबेडकर यांच्या सहभागामुळे या आंदोलनाला नवसंजीवनी मिळाल्याचे प्रतिपादन आंदोलकांनी केले.
बोधगया येथील ऐतिहासिक महाविहार अनेक दशकांपासून सरकारी नियंत्रणाखाली आहे. याविरोधात बौद्ध समाजाकडून विहार मुक्तीची मागणी होत असून देशभरातील बौद्ध अनुयायी यासाठी एकत्र आले आहेत. अॅड. आंबेडकर यांचा सलग दुसऱ्या दिवशीचा सहभाग आंदोलनकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
No comments:
Post a Comment