मुंबई - मध्य रेल्वेच्या उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १०:५५ ते दुपारी ३.५५ या वेळेत ब्लॉक असेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. ब्लॉक दरम्यान मस्जिद बंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी आणि करी रोड या स्थानकांवर उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध राहणार नाहीत.
घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील. ब्लॉक दरम्यान करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मस्जिद बंदर या स्थानकांवर उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध राहणार नाहीत.
ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉक -
ठाणे आणि वाशी/नेरूळ दरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.१० या वेळेत ब्लॉक असेल. ठाण्याहून वाशी/नेरूळ/पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.३५ ते संध्याकाळी १६.०७ पर्यंत रद्द राहतील.
No comments:
Post a Comment