मुंबई - मध्य रेल्वे मार्गावरील नेरळ स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी रविवारी ६ एप्रिल रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २.३० पर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉक कालावधीत बदलापूर आणि कर्जत स्थानकांदरम्यान सकाळी ११.३० ते दुपारी २.३० पर्यंत उपनगरीय सेवा रद्द करण्यात आली आहे.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.५७ वाजता सुटणारी (एस-१७) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कर्जत लोकल, सीएसएमटी येथून सकाळी १०.३६ वाजता सुटणारी (एस-१९) सीएसएमटी-कर्जत लोकल, सीएसएमटी येथून सकाळी ११.१४ वाजता सुटणारी (एस-२१) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कर्जत लोकल, ठाणे येथून दुपारी १२.०५ वाजता सुटणारी (टीएस-५) ठाणे-कर्जत लोकल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी १२.२० वाजता सुटणारी (केपी-५) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - खोपोली लोकल अंशतः रद्द करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment