
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एच/पश्चिम विभागातील खारदांडा स्मशानभूमीमध्ये दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या स्मशानभूमीच्या ठिकाणची दहन सेवा दिनांक १ मे २०२५ ते १५ मे २०२५ या कालावधीत बंद राहील. या कालावधीत सदर स्मशानभूमी वापरासाठी उपलब्ध नसेल.
खारदांडा येथे वायू प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कामांसाठी स्मशानभूमी बंद ठेवण्याबाबत झोपडपट्टी सुधार मंडळाचे पश्चिम विभागाचे उप अभियंता-५ यांनी महानगरपालिकेला पत्राद्वारे कळविले होते. त्यानुसार सदर स्मशानभूमी दिनांक १ मे २०२५ ते १५ मे २०२५ या दरम्यान बंद राखण्यात येईल. एच पश्चिम विभागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी ‘एच पश्चिम’ विभागातील सांताक्रुझ स्मशानभूमी येथे पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे. दुरूस्तीच्या कामानंतर खारदांडा स्मशानभूमीच्या वापराची सुविधा पूर्ववत उपलब्ध करून देण्यात येईल, असे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याद्वारे कळविण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment