डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

17 April 2025

demo-image

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तरुणांपर्यंत पोहोचविणे महत्त्वाचे

1001183321

मुंबई - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाने तरुणांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले. 

सामाजिक न्याय, नगरविकास, परिवहन, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक व औकाफ राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नुकतीच इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि कामकाजाचा आढावा घेतला. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केले.

यावेळी आमदार भाई गिरकर, सहसचिव सोमनाथ बागुल, सह आयुक्त प्रसाद खैरनार, कार्यकारी अभियंता प्रदीप अहिरे, नगरसेविका समिता कांबळे, माजी नगरसेवक शरद कांबळे, राहुल कांबळे, अशोक कांबळे आदीसह, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई महानगरपालिका, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की, स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक आणि सामाजिक इतिहास प्रभावीपणे मांडण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान, ऑडिओ-विज्युअल माध्यमे, इंटरेक्टिव्ह डिस्प्ले, लेझर शो इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. जगातील आणि देशातील विविध स्मारकाचा अभ्यास करून आपला इतिहास आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत कसा पोहोचवता येईल यासाठी नियोजन करावे.

तसेच, स्मारकाच्या मार्गिका, स्वच्छता व सुरक्षा व्यवस्था यावरही लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कामांची गुणवत्ता राखत, इलेक्ट्रॉनिक कामे समांतरपणे (फेजनुसार)  सुरू ठेवावी जेणेकरून स्मारक लवकरात लवकर पूर्ण होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले. स्मारकात उभारण्यात येणाऱ्या व्याख्यानगृह, ग्रंथालय, सभागृह, विपश्यना केंद्र अशा विविध सभागृहात स्वच्छता आणि सुरक्षा यास प्राधान्य देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.  सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये देखभाल दुरुस्तीसाठींच्या उपाययोजनांबाबत निर्णय घ्यावेत अशा सूचनाही राज्यमंत्री मिसाळ यांनी दिल्या.
यावेळी समितीतील सदस्य, कार्यकारी अभियंते आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनी कामाची सद्यस्थिती जाणून घेतली व आवश्यक त्या सुधारणा सुचवल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages