मुंबई - गेल्या काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्हा चर्चेत आला होता. त्यानंतर अनेक गुन्हेगारीच्या घटना या जिल्ह्यात घडल्या होत्या. अशातच आता अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे 36 वर्षीय महिला वकिलाला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पहा आणि तुम्हाला झोप कशी लागते ते सांगा ? असा संतप्त सवाल केला आहे. रोहिणी खडसे यांनी आपल्या एक्स हँडलवरून प्रतिक्रिया दिली आहे त्यात त्या म्हणाल्या आहेत की, डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याने त्याची तक्रार केल्याने एका महिला वकिलाला गावच्या सरपंचाने कार्यकर्त्यांसोबत मिळून बेदम मारहाण केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात घडली आहे. लाठ्या काठ्या आणि पाईपच्या मदतीने केलेल्या या महाराहाणीत महिला वकील जबर जखमी झाल्या आहेत.
पुढे त्या म्हणाल्या की, वकील असलेल्या महिलेला जर मारहाण होत असेल तर या राज्यात कायद्याचा धाक किती आहे हे दिसून येते. या घटनेमुळे महाराष्ट्र आता बिहारच्याही पुढे गेलाय असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे.
No comments:
Post a Comment