मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरून मुंबईतील पाण्याच्या प्रश्नावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महापालिका कार्यालयाबाहेर आक्रमक आंदोलन करण्यात आले. शिवसेना विभागप्रमुख तुकाराम (सुरेश) कृष्णा पाटील आणि विभाग समन्वयक प्रज्ञा प्रकाश सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर पश्चिम आणि घाटकोपर पूर्व विभागाच्या शिष्टमंडळाने महापालिकेच्या एन विभाग कार्यालयाला भेट दिली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व आमदार आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ईशान्य मुंबई प्रभाग क्रमांक 8 येथून महापालिका कार्यालय, 'एन' प्रभाग, घाटकोपर पूर्व येथे हंडा मोर्चा काढण्यात आला. या हंडा मोर्चाअंतर्गत दूषित पाणीपुरवठा, कमी दाबाने होणारा पाणी, प्रभागातील अघोषित पाणीकपात, नाल्यांच्या सफाईच्या समस्या, खराब झालेले रस्ते, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, प्रस्तावित कचराकुंड्या अशा विविध पाणीप्रश्नांविरोधात निदर्शने करण्यात आली.
यावेळी शिवसेना विभागप्रमुख तुकाराम (सुरेश) कृष्णा पाटील व विभाग संघटक प्रज्ञा प्रकाश सकपाळ यांच्यासह विधानसभा अध्यक्ष सुभाष पवार, संजय चव्हाण, उपविभाग प्रमुख सुनील मोरे, चंद्रपाल चंदेलिया, विलास पवार, विजय पडवळ, अजित गुजर, विधानसभा विभागाचे सर्व अधिकारी, शिवसेना शाखाप्रमुख, शिवसेना शाखाप्रमुख, नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व समस्यांबाबत शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटील यांची भेट घेऊन लवकरच सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.
No comments:
Post a Comment