मालेगाव - महाराष्ट्रातील शाळांमधील शिक्षक लवकरच गणवेशात दिसणार आहेत. राज्य सरकारने सर्व शाळांतील शिक्षकांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
मालेगाव तालुक्यातील अजंग येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक डेस्क आणि शालेय बॅग वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मंत्री भुसे बोलत होते. त्यांनी सांगितले की, शिक्षकांना ड्रेसकोड लागू झाल्यानंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षकही एकसमान गणवेशात दिसतील. गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षणासाठी विविध योजना व उपक्रम शासनाच्या माध्यमातून राबवले जात आहेत. विद्यार्थ्यांनी नियमित शाळेत येऊन शिक्षण घ्यावे, पालकांनी संवाद ठेवावा, आणि शाळांनी सहलीसारखे उपक्रम आयोजित करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
No comments:
Post a Comment