मुंबई - देशभरातील सम्राट अशोक राजांच्या शिलालेखांचा गाढे अभ्यासक आणि शिलालेखांचे प्रत्यक्षात जागेवर जाऊन वाचन करणारे अशोक तपासे यांना फ्रॅंकफोर्ड युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. शिलालेखांच्या अच्युत कामगिरीची पोचपावती म्हणून त्यांना ही डॉक्टरेट देण्यात आली आहे. त्यामुळे लेणी संवर्धन चळवळीकडून तपासे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.
अशोक तपासे यांनी २००९पासून पालि भाषेचे अभ्यासक आहेत. त्याचा शिलालेखांचा अभ्यास सुद्धा आहे. ब्राह्मी लिपी शिकून त्यांनी भारतभर भ्रमण केले. जेथे जेथे सम्राटांचे शिलालेख आहेत. त्या स्थळांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. कालसी (उत्तराखंड ) ते ब्रह्मगिरी (कर्नाटक ) आणि जुनागड (गुजरात ) ते जोऊँगडा (ओरिसा)पर्यंत त्यांनी ३५ शिलालेखांचे वाचन केले. वेगवेगळ्या स्थळांवरील शिलालेखातील मजकूर व त्याच्या आशयाबाबत त्यांना फरक जाणवला व तो त्यांनी शोध निबंधातून मांडला आहे.
२०१४ मध्ये शिलालेखावर पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये त्याची हिंदी आवृत्ती आली. त्याच वर्षी त्यांनी श्री श्री विद्यापीठ येथे शोधनिबंध सादर करून बुद्ध यांचे महापरिनिर्वाण इ. स. पूर्व ५१६ मध्ये झाले असल्याचे शिलालेखावरून स्पष्ट होते असल्याचा पुरावा अधोरेखित केला. या शोध निबंधाचे हिंदी भाषांतर करून त्यांनी जबलपूर व तेलंगणा येथील सोशल सायन्स अँड मॅनेजमेंट स्टडीज आणि एपीग्राफिकल सोसायटी ऑफ इंडिया यांना सादर केले. म्हणूनच फ्रॅंकफोर्ड युनिव्हर्सिटीने त्यांना डॉक्टरेट प्रदान करून त्यांचा गौरव केला आहे.
सध्या ते भारतीय बौद्ध कालमापनावर संशोधन करीत असून स्वतंत्र बौद्ध कालमापन पद्धती कशी अवलंबिता येईल याचा अभ्यास करीत आहेत. अशोक तपासे हे इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये पदविका धारक आहेत. समता नगर येथील टेलिफोन कार्यालयातून निवृत्त झाल्यावर शिलालेखांच्या प्रांगणात त्यांनी भरारी कामगिरी केली आहे.
No comments:
Post a Comment