भोईवाडा येथील पुनर्विकासाला गती द्या – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

04 April 2025

demo-image

भोईवाडा येथील पुनर्विकासाला गती द्या – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

1740043639009530704034776056099

मुंबई - दादर भोईवाडा गाव पुनर्विकासाला गती देऊन या ठिकाणी मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांची मुंबई महापालिकेने सुरक्षित ठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली भोईवाडा गाव पुनर्विकासाबाबत बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बिपीन शर्मा, भोईवाडा पुनर्विकास सहकारी सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

भोईवाडा गाव भागाचा पुनर्विकास गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे आता त्याला गती देण्यासाठी विकासकाला एक संधी देण्यात यावी. याठिकाणी काही रहिवाशी मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये वास्तव्यास असून त्यांची तातडीने सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी. मुंबई महापालिकेने विशेष बाब म्हणून या रहिवाशांची पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages