१० ते १४ एप्रिल ‘आपले सरकार’ पोर्टल बंद राहणार - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

09 April 2025

demo-image

१० ते १४ एप्रिल ‘आपले सरकार’ पोर्टल बंद राहणार

image

मुंबई- महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून १० एप्रिल २०२५ (गुरुवार) ते १४ एप्रिल २०२५ (सोमवार) दरम्यान ‘आपले सरकार’ पोर्टलवर नियोजित देखभाल आणि हार्डवेअर अद्ययावत करण्याचे काम करण्यात येणार आहे. या कालावधीत ‘आपले सरकार सेवा पोर्टल’ वरील सर्व सेवा आणि प्रणाली काही काळासाठी अनुपलब्ध राहतील.

दिनांक १० ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत बहुतांश दिवस सार्वजनिक सुट्ट्या असल्यामुळे, नागरिकांनी, आपले सरकार सेवा केंद्र/ सेतू केंद्र चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी, ग्रामपंचायतींनी तसेच शासनाच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी आपापल्या सेवा संबंधित कामांचे नियोजन पूर्वीच करावे, असे आवाहन माहिती तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages