मुंबई - उद्या २३ मार्च २०२५ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकचा परिणाम मुख्य म्हणजे मेन लाईन आणि हार्बर लाईनवरील लोकल सेवेवर होणार असून काही गाड्यांचे वेळापत्रक बदलले जाईल, तर काही सेवा रद्द केल्या जातील. प्रवाशांनी पर्यायी व्यवस्थेचा वापर करावा असे रेल्वे प्रशासनाने आवाहन केले आहे. (Railway Mega block)
मध्य रेल्वे
मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जाणार आहेत.
हार्बर रेल्वे
हार्बर रेल्वे मार्गावरी कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉकचे असणार आहे. या काळात सीएसएमटीहून पनवेल, बेलापूर, वाशीसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल, बेलापूर, वाशी येथून सीएसएमटीकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष सेवा चालवल्या जाणार आहेत.
पश्चिम रेल्वे
चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याकाळात चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकादरम्यान सर्व अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावर वळविल्या जाणार आहेत.
No comments:
Post a Comment