मुंबई - शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांना महापालिका निवडणुकीच्या तयारी लागण्याचे निर्देश दिले आहेत. पालिका निवडणुकीपूर्वी पक्ष संघटनेचे कामकाज जाणून घेण्यासाठी खासदार शिंदे यांचा मुंबईत शिवसंवाद दौरा सुरु आहे. आज अंधेरी येथे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
अंधेरी येथील मातोश्री क्लब येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर पश्चिम मुंबई मतदार संघातील विधानसभानिहाय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी आज चर्चा करण्यात आली. यावेळी प्रभागांत पक्षाचे कशा प्रकारे कामे सुरु आहे याची शाखा प्रमुख, विभाग प्रमुख यांच्याकडून माहिती जाणून घेतली. स्थानिक पातळीवरील माहितीचा अहवाल पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाणार आहे, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील ६३ मतदार संघात जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या होत्या, याचा पक्षाला निवडणुकीत फायदा झाला, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. उद्या ९ मार्च रोजी मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघात पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाणार आहे, असे ते म्हणाले.
आजच्या बैठकीला खासदार रविंद्र वायकर, माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार मुरजी पटेल, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी, सचिव किरण पावसकर, सचिव भाऊसाहेब चौधरी, सचिव सिद्धेश कदम, उपनेते संजय निरुपम, उपनेत्या शीतल म्हात्रे, उपनेत्या कला शिंदे, शायना एनसी आदि पदाधिकारी उपस्थिती होते.
No comments:
Post a Comment