१८ मार्चला मुलुंडमधील पाणीपुरवठा बंद - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

१७ मार्च २०२५

demo-image

१८ मार्चला मुलुंडमधील पाणीपुरवठा बंद

bmcjpn

मुंबई - मुलुंड पूर्व येथे ७५० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी क्षतीगस्त झाल्याने टी विभागातील काही भागातील पाणीपुरवठा दिनांक १८ मार्च रोजी काम पूर्ण होईपर्यंत राहणार बंद राहणार आहे. संबंधित परिसरातील नागरिकांनी, पाणी काटकसरीने वापरून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन महापालिका प्रशासनाच्‍यावतीने करण्‍यात आले आहे. 

मलनिस्सारण प्रकल्प विभागामार्फत सूक्ष्म बोगद्याचे काम सुरू असताना आज दिनांक १७ मार्च २०२५ रोजी मुलुंड पूर्व येथे ७५० मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीस हरी ओम् नगर व म्हाडा कॉलनी मध्ये असलेल्या नाल्याच्या तळाला हानी पोहोचली. त्यामुळे जलवाहिनीस मोठ्या प्रमाणावर गळती आढळून आली. सदरच्या ठिकाणी जलवाहिनी दुरुस्तीचे काम सहाय्यक अभियंता (जलकामे) परिरक्षण पूर्व उपनगरे घाटकोपर यांच्या मार्फत हाती घेण्यात आले आहे.

जलवाहिनी दुरुस्ती काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. दुरुस्ती काम पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी अंदाजे १२ ते १४ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे . त्यामुळे खालील नमूद भागात दिनांक १८ मार्च २०२५ रोजी दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत पाणी पुरवठा होणार नाही.

पाणी पुरवठा बंद राहणारा परिसर
टी वॉर्ड
मुलुंड पूर्व - पूर्व द्रुतगती मार्गाच्या पूर्वेकडील भाग, म्हाडा वसाहत , हरी ओम् नगर
 
मुलुंड पूर्व - पूर्व द्रुतगती मार्गाच्या पश्चिमेकडील भाग ते मुलुंड स्टेशन पर्यंतचा परिसर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Pages