जलवाहिनीला गळती, मुलुंड पश्चिमसह भांडुप येथील पाणीपुरवठा बंद - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

29 March 2025

demo-image

जलवाहिनीला गळती, मुलुंड पश्चिमसह भांडुप येथील पाणीपुरवठा बंद

bmcjpn

मुंबई - मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला आज भांडुप येथे गळती झाली आहे. जलवाहिनीला गळती झाल्याने मुलुंड पश्चिम आणि भांडुप येथील काही विभागात पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर या विभागातील पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात येईल अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

मुलुंड पश्चिमेकडील टी विभागाला  पाणीपुरवठा करणाऱ्या १८०० मिलीमीटर  व्यासाच्या जलवाहिनीवर भांडुप पश्चिमेकडील तानसा जलवाहिनी जवळ मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याचे आज (दिनांक २९ मार्च २०२५) आढळून आले आहे. सदरच्या ठिकाणी जलवाहिनी दुरुस्तीचे काम सहाय्यक अभियंता (जलकामे) परिरक्षण पूर्व उपनगरे घाटकोपर यांच्या मार्फत हाती घेण्यात आले आहे. दुरुस्ती काम युद्ध पातळीवर सुरू असून, काम पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी अंदाजे १० ते १२ तासांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे खालील भागात पाणी पुरवठा होणार नाही. जलवाहिनी दुरुस्ती काळात नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे व सहकार्य करण्याचे विनम्र आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

बाधित होणार परिसर - 
टी विभागात मुलुंड पश्चिमेकडील काही भागात अमर नगर, खिंडीपाडा,जीजीएस मार्गावरील परिसर, मुलुंड कॉलनीचा परिसर, राहुल नगर, शंकर टेकडी, हनुमानपाडा, मलबार हिल रोड, स्वप्ननगरी, घाटीपाडा, बी आर रोड, इत्यादी परिसर व तसेच एस विभागतील खिंडीपाडा, नजमा नगर येथील आजूबाजूचा परिसर 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages