
मुंबई - मंत्रालयामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे काम बृहन्मुंबई महापालिकेमार्फत करण्यात आले असून मंत्रालयामध्ये पाणीपुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.
मंत्रालय मुख्य व विस्तार इमारतीमध्ये बृहन्मुंबई महापालिकेमार्फत पाणीपुरवठा केला जातो. ज्या पाणीपरवठा पाईपलाईनमधून पाणीपुरवठा होतो. त्यामध्ये रेती आणि खडी जमा झाल्यामुळे पाईपलाईन अंशतः जाम झाली होते. त्यामुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. त्यामध्ये पाणी कमी प्रमाणात उपलब्ध झाले. पर्यायी व्यवस्था म्हणून तातडीने टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला.
सद्यस्थितीत पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात आले असून मंत्रालयातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे.
No comments:
Post a Comment