मुंबई - कृत्रिम बुद्धीमत्ता म्हणजेच एआयचा वापर सर्वच क्षेत्रात करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शासनाने देखील एआयसाठी धोरण आखायला सुरुवात केली असून महाराष्ट्राची एआय पॉलिसी एप्रिल महिन्यात येईल, अशी घोषणा माहिती व तंत्रज्ञानमंत्री आशिष शेलार यांनी विधानपरिषद सभागृहात केली आहे.
केरळ आयरस अशी एक एआय टिचर निर्माण करण्यात आली आहे. एआय चांगल्या दृष्टीने शिक्षणात येणे क्रांती ठरेल, आपण यासंदर्भात एक समग्र धोरण आणावं, असा प्रश्न भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी उपस्थित केला होता.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे, यासाठी राज्याचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण तयार करण्याचे निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आधीच दिले होते. ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्याोग-व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळतील व तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करू शकेल, असे देखील शेलार यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment