आरोग्य सेवेतील गट - ड च्या 680 पदांची सरळसेवेने भरती - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

22 March 2025

demo-image

आरोग्य सेवेतील गट - ड च्या 680 पदांची सरळसेवेने भरती

Health%20News

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत तसेच आयुर्वेद महाविद्यालयासह संलग्न नऊ रुग्णालयातील गट ड संवर्गातील 680 पदांची सरळसेवेने भरती करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्यात. रुग्णालयातील रुग्णांना उत्तम सेवा देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात गट - ड संवर्गातील मंजूर पदापैकी बऱ्याच वर्षापासून 680 पदे रिक्त होती. रिक्त असलेल्या पदावर सरळसेवा भरतीची प्रक्रिया तात्काळ सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीतर्फे पदभरतीची एकत्र प्रक्रिया राबविण्यात आली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना या समितीचे सदस्य सचिव म्हणून नेमण्यात आले होते.

रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवड झालेल्या 13 उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्तीचे आदेश देण्यात आले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये उपस्थित होते.

जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मेयो, दंत, आयुर्वेद महाविद्यालय व सलग्नित रुग्णालयातील गट ड सवर्गातील सरळसेवेचे रिक्त पदे भरण्याकरिता मागणीपत्र सामाजिक व समांतर आरक्षणासह मागविण्यात आले होते. जिल्ह्यातील नऊ संस्थांकडून 680 रिक्त पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अर्जामधून 680 उमेदवारांची निवड करण्यात आली. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 66 पदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये 344 पदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोउपचार रुग्णालयासाठी 19 पदे, ग्रामीण आरोग्य केंद्र सावनेर 11 पदे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 57 पदे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी 135 पदे, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयासाठी 22 पदे, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय 3 पदे तर शासकीय आयुर्वेद रुग्णालयासाठी 23 पदांचा समावेश आहे.

रुग्णसेवेला बळकटी
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व विविध सलग्नित रुग्णालयात एकत्र 680 रिक्त पदांची भरती होत असल्यामुळे रुग्णसेवेला बळकटी मिळणार आहे. रुग्णसेवेसाठी गट ड मधील भरती अत्यंत आवश्यक होती. अशी प्रतिक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व निवड समितीचे सदस्य सचिव डॉ.राज गजभिये यांनी यावेळी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages