मुंबई / पटना - बुद्धगया येथील महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात दिले पाहिजे. त्यासाठी महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करण्यात यावा या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी झालेल्या चर्चेत महाबोधी महाविहार ट्रस्टमध्ये अध्यक्ष, सचिव आणि सर्व सदस्य बौद्ध असावेत अशी मागणी आठवले यांनी नितीश कुमार यांच्याकडे केली. तसेच बुद्धगया येथे भिक्खू संघाच्या वतीने चाललेल्या आंदोलनाला राज्य सरकारने भेट देण्याची सूचना आठवले यांनी केली. यावेळी बुद्धगया महाबोधी महाविहार कायदा रद्द करण्याचे निवेदन आठवले यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना दिले.
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार आंदोलनाची पूर्ण माहिती घेऊन बौद्धांच्या ताब्यात महाबोधी महाविहार देण्याबाबत सकारात्मक चर्चा मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्याशी केली. याबाबत बिहारचे मंत्री यांच्यावर जबाबदारी सोपवत असून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्याला दिल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.
No comments:
Post a Comment