चवदार तळे सत्याग्रहाच्या 98व्या वर्धापनदिनी रायगड जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्यावतीने आयोजित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करणाऱ्या जाहिर सभेत रामदास आठवले बोलत होते. त्यावेळी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाश मोरे, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, युवक आघाडी प्रदेश अध्यक्ष पप्पू कागदे आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाबोधी टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करुन बुध्दगयेतील महाबोधी महाविहाराचा ताबा बौध्दांना देण्यासाठी प्रधानमंत्री नरेद्र मोदी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना निर्देश देऊ शकतात तसा प्रयत्न आपण करणार आहोत. त्याच बरोबर मी स्वतः बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांना आणि बिहारचे राज्यपाल मो. आरीफ खान यांना भेटून बुध्दगयेतील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी करणार आहे. तसेच बुध्दगयेत तीन दिवस थांबून बुध्द भिक्खूंच्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहे. महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्रा सोबत बिहार आणि संपूर्ण देशभर आंदोलन सुरु ठेवणार आहे. महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात रिपब्लिकन पक्ष ताकदीने उतरला असुन सर्व आंबेडकरी जनतेने एकजुटीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला बळ द्यावे असे आवाहन आठवले यांनी केले.
सभेपूर्वी रामदास आठवले यांनी महाड येथील क्रांतीस्तंभाला विनम्र अभिवादन केले. महाड चवदार तळे, भीमा कोरेगाव येथे जाहीर सभा घेण्याची सुरुवात भारतीय दलित पँथर पासून आम्ही सुरू केल्याची आठवण यावेळी आठवले यांनी सर्वांना करून दिली.
No comments:
Post a Comment