मुंबई - कार्यालयीन कामकाजाच्या अनुषंगाने विविध प्रकरणांवर अपीलअंतर्गत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात घेतल्या जाणार्या सुनावण्यांमध्ये निर्णय झाल्यानंतर संबंधित आदेश ७ दिवसांच्या आत निर्गमित करावेत, असे स्पष्ट निर्देश 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांनी दिले आहेत.
उपाध्यक्ष यांच्या दालनात विकास नियंत्रण नियमावली ३३(७), बृहतसूची (मास्टर लिस्ट), म्हाडा संगणकीय सोडत व इतर विषयांवरील अपील सुनावण्या घेतल्या जातात. मात्र, या सुनावण्यांवरील आदेश निर्गमित होण्यासाठी एक महिना, दोन महिने किंवा त्याहून अधिक कालावधी लागत असल्याचे आढळून आल्याने जयस्वाल यांनी हा कालावधी सात दिवसांवर मर्यादित ठेवण्याचा निर्णय एका कार्यालयीन आदेशाद्वारे आज जाहीर केला आहे.
तसेच सदरील निर्णय म्हाडाच्या विभागीय मंडळांतील मुख्य अधिकारी व इतर विभाग प्रमुखांच्या स्तरांवर घेण्यात येणाऱ्या सुनावणींकरिता देखील लागू करण्यात यावेत, असे निर्देश जयस्वाल यांनी संबंधित अधिकार्यांना दिले आहेत.
No comments:
Post a Comment