मुंबई - रमजान ईद, सोमवार दिनांक ३१.०३.२०२५ रोजी साजरी केली जाईल आणि त्यानंतर मंगळवार दिनांक ०१.०४.२०२५ रोजी बासी ईद साजरी केली जाईल. बासी ईदच्या दिवशी संपूर्ण शहरात, विशेषतः मोहम्मद अली रोड, हाजी अली, शिवाजीनगर, अंधेरी, जुहू चौपाटी, मालवणी, जोगेश्वरी, माहीम, धारावी, अॅन्टॉप हिल इत्यादि भागात अतिरिक्त रहदारी निर्माण होण्याच्या अपेक्षेने प्रवासी वाहतूक सुरळीत करण्यासाठी बेस्ट प्रशासन दरवर्षी जादा बसगाड्या चालवते.
याही वर्षी बासी ईदच्या दिवशी अधिक प्रमाणात होणारी प्रवासी वाहतूक सुरळीत आणि प्रभावीपणे होण्यासाठी आणि मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेऊन १२८ जादा बसेस चालवण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तरी या बसचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment