Budget केंद्रीय अर्थसंकल्पात बिहारसाठी घोषणांचा पाऊस - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

01 February 2025

demo-image

Budget केंद्रीय अर्थसंकल्पात बिहारसाठी घोषणांचा पाऊस

BUDGET

नवी दिल्ली - विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून बिहारसाठी मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प मांडला. त्यात बिहार विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. तसेच, केंद्रात महत्वाचा भूमिका बजावणा-या नितीशकुमार यांनाही खूष करण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आलेला आहे.

बिहार राज्याच्या भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी बिहारमध्ये ग्रीनफिल्ड विमानतळ बांधणार आहेत. पटना विमानतळाचा विस्तारही करण्याची घोषणा या वेळी केंद्रीय मंत्री सीतारामण यांनी केली आहे. मिथिलांचलमधील ‘वेस्टर्न कॉस्ट कॅनॉल’ प्रकल्पाचाही त्यात समावेश आहे.

मखानाचे (फॉक्स नट) उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि व्यापार सुधारण्यासाठी बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. बिहारच्या लोकांसाठी ही विशेष संधी आहे. यातील उद्योजकांना ऋढड मध्ये संघटित केले जाईल. मखाना उत्पादक शेतक-यांना मदत आणि प्रशिक्षण सहाय्य देण्यासाठी आणि त्यांना सर्व संबंधित सरकारी योजनांचा लाभ मिळावा, याची खात्री करण्यासाठी काम केले जाईल, असे अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितले.

पटना आयआयटीचा विस्तार करण्याची घोषणा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयआयटीची क्षमता वाढविण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. देशातील पाच आयआयटीमध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. पटना आयआयटीचा विस्तार करण्याची घोषणाही सीतारामन यांनी केली आहे.

बिहारमधील शेतक-यांसाठी मोठ्या घोषणा
बिहारमध्ये राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्था स्थापन करण्यात येणार आहे. ही संस्था संपूर्ण पूर्व भागातील अन्न प्रक्रिया उपक्रमांना बळकट करेल. या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या उत्पादनाचा दर्जा सुधारून त्यांचे उत्पन्न वाढवतील. या संस्थेमुळे युवकांना कौशल्य, उद्योजकता आणि रोजगार मिळण्याच्या संधी निर्माण होणार आहेत.

कोसी, मिथिलाला मोठी भेट
बिहारमध्ये नवीन ग्रीन फील्ड विमानतळ बांधणार, पश्चिम कोसी कालवा प्रकल्पाला आर्थिक मदत, कोसी कालव्यातून ५० हजार हेक्टर सिंचन, मिथिलांचलसाठी सिंचन योजना

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages