मुंबई - राज्यभरात थैमान घालणाऱ्या GBS (गुलेन-बॅरे सिंड्रोम) आजाराने मुंबईत एका रुग्णाचा बळी घेतला आहे. नायर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ५३ वर्षीय रुग्णाचा मृत्यू GBS मुळे झाल्याचा उघडकीस आलं आहे. GBS च्या मृत्यूचा आकडा आता ८ वर गेला आहे.
११ फेब्रुवारी २०२५ रोजी ५३ वर्षीय पुरुष रुग्णाला पायामध्ये अशक्तपणा आल्याने नायर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हा रुग्ण एफ उत्तर विभागात राहणारा होता. २३ जानेवारी २०२५ रोजी रुग्णाची स्थिती गंभीर असल्याने त्याला अतिदक्षता विभागात (ICU) हलवण्यात आले आणि श्वसन घेण्यास त्रास होत असल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. रुग्णांची चाचणी केली असता त्याला GBS ची लागण झाल्याचे निदान झाले. त्याला नायर रुग्णालयामध्ये GBS चे योग्य ते उपचार दिले मात्र उपचार सुरु असताना १० फेब्रुवारी रोजी या रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णाला यापूर्वी कोणताही ताप किंवा अतिसार (Diarrhea) चे लक्षणे नव्हते. तसेच रुग्णाला रक्तदाब होते. हा रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याच्या १६ दिवसापूर्वी पुण्याला जाऊन आला होता.
या व्यतिरिक्त पालघरमध्ये राहणारी १६ वर्षाची मुलगी ही नायर रुग्णालयात दाखल आहे, रुग्णाला यापूर्वी ताप होता आणि सध्या स्थितीत तिची तब्येत सुधारत आहे. गुइलेन-बेरै सिंड्रोम (जीबीएस) च्या उपचारासाठी मुंबईतील सर्व महानगरपालिका रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये सुसज्ज आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधोपचार, साधनसामग्री आणि तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.
राज्यात १९७ रुग्ण -
राज्यात १९७ रुग्ण आहेत, सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहेत. यामध्ये १७२ रुग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. तर ५० रुग्ण आयसीयुमध्ये दाखल केले आहेत आणि २० व्हेंटिलेटर आहेत. हा आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. या आजाराची लक्षण जाणवताच प्रथम डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे.
गुइलेन-बॅरे सिंड्रोमची माहिती -
• गुइलेन-बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ ऑटोइम्यून (Auto immune) विकार आहे, ज्यात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या चेतासंस्थांवर (peripheral nervous system) हल्ला करते. यामुळे स्नायू कमजोर होतात, आणि गंभीर रुग्णामध्ये पक्षाघातही होऊ शकतो. गुलियन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) हा संसर्गजन्य रोग नाही आणि तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरत नाही. याचे निश्चित कारण अज्ञात आहे. हा आजार एखाद्या श्वसन किंवा पचनसंस्थेच्या संसर्गानंतर होतो आणि त्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे.
• जीबीएस हा रोग नवा नसून, तो अनेक वर्षांपासून ओळखला जातो. हा संसर्गजन्य रोग नसला, तरी काही वेळा जीवाणू किंवा विषाणूच्या संसर्गानंतर तो विकसित होऊ शकतो. तसेच GBS चे बरेच इतर कारण असतात.
• जीबीएस हा आजार वर्षभर आढळतो. साधारणपणे १ लाख लोकांमध्ये एक जण या आजाराने ग्रस्त असते. त्यामुळे, मुंबईसारख्या मोठ्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर महिन्याला काही जीबीएसचे रुग्ण उपचारासाठी येतात.
आजाराची लक्षणे -
• अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी / लकवा.
• अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा कमजोरी.
• डायरिया (जास्त दिवसांचा) आणि ताप इत्यादि.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी -
• पिण्याचे पाणी उकळून प्यावे.
• स्वच्छ व ताजे अन्न खावे.
• वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.
• शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित न ठेवल्यास संसर्ग टाळता येईल.
• हात किंवा पायांमध्ये अचानक वाढत जाणारा अशक्तपणा असल्यास त्वरित जवळच्या म.न.पा. रुग्णालयात जाऊन डॉक्टरांना दाखवावे.
• नागरिकांनी घाबरुन न जाता उपरोक्त कुठलेही लक्षणे आढळल्यास मार्गदर्शन व उपचाराकरिता जवळच्या मनपा रुग्णालयास त्वरित संपर्क करावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

No comments:
Post a Comment