बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

07 February 2025

demo-image

बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे

best%20buses

मुंबई - बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार एस.व्ही. आर. श्रीनिवास यांनी ६ फेब्रुवारी २०२५ रोजी स्विकारला आहे. ते १९९१ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत. बेस्टच्या महाव्यवस्थापक पदाची जबाबदारी कोणीही आय ए एस अधिकारी घेत नसल्याने हे पद गेले काही महिने रिक्त होते. 

एस.व्ही. आर. श्रीनिवास यांना २० वर्षांहून अधिककाळ भारतीय प्रशासकीय सेवेशी संबंधित नगर संरचना, शहरी वाहतूक, मेट्रो रेल्वे आणि नगर नियोजन या विभागांचा अनुभव आहे. त्यांनी बृहन्मुंबई महानगर पालिका (BMC), मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यामध्ये वरिष्ठ नेतृत्वाची पदे भूषविली आहेत. सध्या श्रीनिवास हे धारावी पुनर्वकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

त्यांनी नगर नियोजन आणि शहरी गृहनिर्माण (नूतनीकरण), वित्त, शहरी पायाभूत प्रकल्प, संरचना, नियोजन आणि अंमलबजावणी यासारख्या महत्वाच्या पायाभूत विभागांमध्ये सर्वोच्च पदे भूषवली आहेत. त्यांनी मेगा गृहनिर्माण प्रकल्प उभारणीमध्ये मोलाचा हातभार लावला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय निधी एजन्सी आणि जागतिक कार्पोरेटस् संस्थांमध्येही सहभाग घेतला आहे.

श्रीनिवास यांची खालील महत्वाच्या प्रकल्पांमध्ये महत्वाची भूमिका - 

• मेट्रो रेल्वे प्रकल्प

• मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक (MTHL) भारतातील सर्वांत लांब सागरी सेतू

• शहरी पाणी पुरवठा प्रकल्प बोगदे आणि उन्नत रस्ते

• नगर नियोजन

• मुंबई आणि इतर शहरांतील परवडणारी गृहसंकुले.

• गृहनिर्माण धोरण

• धारावी पुनर्विकास प्रकल्प

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages