मुंबईत जीबीएसचा शिरकाव, 64 वर्षीय महिलेला जीबीएसची लागण - JPN NEWS

Home Top Ad

Post Top Ad

07 February 2025

demo-image

मुंबईत जीबीएसचा शिरकाव, 64 वर्षीय महिलेला जीबीएसची लागण

1001037982

मुंबई - पुण्यात धुमाकूळ घातलेल्या जीबीएसचा (Guillain Barré syndrome) मुंबईत शिरकाव झाला आहे. अंधेरी येथील एका महिला जीबीएसची संशयीत रुग्ण असल्याचे समोर आले आहे. अंधेरी येथील सेव्हन हील रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू आहेत. मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  (GBS outbreak in Mumbai) (64-year-old woman infected with GBS)

मुंबईच्या अंधेरी पूर्व मालपा डोंगरी परिसरात राहणाऱ्या एका 64 वर्षीय महिलेला दुर्मिळ मज्जातंतू विकार म्हणजेच गुईलेन बॅरे सिंड्रोम जीबीएस आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मुंबई महापालिकेच्या सेवन हिल रुग्णालयात या महिला रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरू  आहेत. अंधेरी पूर्व परिसरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्याची माहिती मिळताच शिवसेनेचे स्थानिक आमदार मुरजी पटेल यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची भेट घेतली. यावेळी रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना भेटून या ठिकाणी जीबीएस रुग्णांसाठी 50 विशेष बेड राखीव ठेवण्याची सूचना केली आहे. शिवाय या रुग्णांवर महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत, अशी माहिती मुरजी पटेल यांनी दिली.

राज्यात एकूण रुग्ण किती ?
पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सांगली, सातारा, नागपूर या शहरांमध्ये आतापर्यंत GBS या आजाराचे रुग्ण सापडले आहेत. पुण्यात या आजाराने आतापर्यंत 173 जण बाधीत झाले आहेत. त्यापैकी 140 जणांना जीबीएस झाल्याचे अंतिम वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. 140 जीबीएस बाधित रुग्णांपैकी 34 रुग्ण पुणे महानगरपालिकेतील आहेत, 87 रुग्ण पीएमसी क्षेत्रातील नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत, 22 रुग्ण पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील आहेत, 22 रुग्ण पुणे ग्रामीणमधील आहेत आणि 8 रुग्ण इतर जिल्ह्यांतील आहेत. 

जीबीएसची लक्षणं –
पाय, हातांमध्ये अचानक अथवा येणे

डायरिया

काय काळजी घ्याल -
पिण्याचे पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

पाणी उकळून पिणे.

अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.

वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा.

शिळे अन्न आणि अर्धवट शिजलेले अन्न (चिकन, मटण) खावू नये.

नागरिकांनी घाबरून न जाता या आजाराची लक्षणे आढल्यास त्वरीत शासकीय रुग्णालयात जावे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages