मुंबई - पश्चिम रेल्वेने माहीम ते वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी २४ व २५ जानेवारी आणि २५ व २६ जानेवारी रात्री मोठा ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे शुक्रवार/शनिवारच्या रात्री १२७ उपनगरीय सेवा रद्द राहतील, तर शनिवार-रविवारच्या रात्री सुमारे १५० उपनगरीय सेवा रद्द राहतील. याशिवाय सुमारे ६० उपनगरीय सेवा अंशत: रद्द करण्यात येणार आहेत. (Mumbai Local Train Update)
पश्चिम रेल्वेने माहीम ते वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी २४ व २५ जानेवारी आणि २५ व २६ जानेवारी रात्री मोठा ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे शुक्रवार/शनिवारच्या रात्री १२७ उपनगरीय सेवा रद्द राहतील, तर शनिवार-रविवारच्या रात्री सुमारे १५० उपनगरीय सेवा रद्द राहतील. त्याचप्रमाणे २५/२६ जानेवारीच्या रात्री यूपी आणि डाऊन स्लो आणि डाऊन जलद मार्गावर शनिवारी रात्री ११ ते रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. जलद मार्गावर शनिवारी रात्री ११ ते रविवारी सकाळी ७.३० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय सुमारे ६० उपनगरीय सेवा अंशत: रद्द करण्यात येणार आहेत. शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत धीम्या मार्गावर माहीम ते वांद्रे स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत डाऊन जलद मार्गही रात्री १२.३० ते ६.३० वाजेपर्यंत ब्लॉक राहणार आहे. याशिवाय लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांनाही या ब्लॉकमुळे फटका बसणार आहे.
शुक्रवारी शेवटची चर्चगेट-विरार धीम्या लोकल रात्री ११ वाजून ५८ मिनिटांनी सुटणार आहे. रात्री ११ वाजल्यापासून चर्चगेटहून सुटणाऱ्या सर्व धीम्या लोकल महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहीम आणि खार रोड स्थानकांवर थांबून मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ दरम्यानजलद मार्गावर धावतील. शनिवारी सकाळी विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर आणि बोरिवली येथून धीम्या आणि जलद लोकल अंधेरीयेथे थांबतील. ब्लॉकनंतर चर्चगेटच्या दिशेने जाणारी पहिली जलद लोकल शनिवारी पहाटे ५.४७ वाजता विरारहून सुटेल आणि चर्चगेटला सकाळी ७.०५ वाजता पोहोचेल. चर्चगेटहून पहिली डाऊन फास्ट लोकल सकाळी ६.१४ वाजता सुटेल तर चर्चगेटहून पहिली डाऊन स्लो लोकल ब्लॉकनंतर सकाळी ८.०३ वाजता सुटेल. तसेच विरार, भाईंदर आणि बोरिवलीयेथून रात्री ११ नंतर सुटणाऱ्या धीम्या गाड्या वरील स्थानके वगळून सांताक्रूझ ते मुंबई सेंट्रल दरम्यानजलद मार्गावर धावतील. हार्बर मार्गावर गोरेगाव ते वांद्रे दरम्यान पश्चिम रेल्वेच्या काही लोकल धावणार आहेत.
No comments:
Post a Comment