मुंबई (अजेयकुमार जाधव) - आगामी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Election) निवडणुकीत सायन कोळीवाडा (Sion Koliwada) विभागातून काँग्रेसचा सुपडा साफ करू असा विश्वास मुंबई भाजपा उपाध्यक्ष व माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा (Ravi Raja) यांनी व्यक्त केला. भाजपाची सदस्य (BJP Membership) मोहीम सुरु असून दिलेले लक्ष पूर्ण केले जाईल. मुंबई महापालिकेत भाजपा सर्वात मोठा पक्ष असेल, पालिकेत भाजपाची सत्ता येईल असा दावा त्यांनी केला.
भाजपाचे सदस्य नोंदणी अभियान सुरु आहे. या पार्श्वभूमीवर रवी राजा बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, पक्षाने आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सदस्य नोंदणी मोहिमेची जबाबदारी दिली आहे. माझ्या सायन कोळीवाडा विभागात काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भाजपाचे सदस्य बनवण्याचे काम सुरु आहे. सध्या सुमारे दोन हजार सदस्य नोंद झाले आहेत. येत्या काही दिवसात पाच हजार सदस्य नोंदणीचे लक्ष पूर्ण करू. काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपात आल्याने सायन कोळीवाडा विभागातून त्यांचा सुफडा साफ होईल.
पालिकेत भाजपाची सत्ता येईल -
ते पुढे म्हणाले की, नुकतीच मंत्री आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष ऍड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवकांची एक बैठक झाली. या बैठकीत नगरसेवकांना निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पक्षाच्या आदेशानुसार सर्वच माजी नगरसेवक कामाला लागले आहेत. त्याचाच एक भाग पक्षाची सदस्य नोंदणी अभियान आहे. भाजपा पक्षाला घराघरात घेऊन जाण्याचे काम सुरु आहे. येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष हा भाजपाच असेल, पालिकेत भाजपाची सत्ता येईल.
कोण आहेत रवी राजा -
मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते असलेले रवी राजा ४० वर्षे काँग्रेस पक्षात काम करत होते. त्यांनी पालिकेच्या सभागृहात, स्थायी समिती तसेच बेस्ट समितीमध्ये मुंबईकरांचे प्रश्न तसेच काँग्रेसची भूमिका लावून धरली होती. त्यानंतरही त्यांच्यावर २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत वेळोवेळी अन्याय करण्यात आला. आपल्यावर काँग्रेस पक्षात अन्याय होत असल्याने रवी राजा यांनी राजीनामा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, स्थानिक आमदार तामिळ सेलवन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. रवी राजा यांच्यावर भाजपात उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment