पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 January 2025

पीएफची रक्कम क्लेमशिवाय मिळणार



नवी दिल्ली - एम्पलॉय प्रॉविडेंट फंड ऑर्गनायझेशनच्या जवळपास ८ कोटी सक्रीय खातेदारांसाठी मोठी बातमी आहे. ईपीएफओ जून २०२५ पासून खातेदारांसाठी स्वंयघोषणापत्र सेवा सुरु करणार आहे. यामध्ये सेल्फ अटेस्टेशन सुविधा उपलब्ध झाल्यानंतर केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्मचा-यांना कंपनीच्या अधिका-यांकडून मंजुरी घेणे आवश्यक राहणार नाही.

ईपीएफओच्या खातेदारांना केवायसी प्रक्रिया एकदा पूर्ण करावी लागते. ज्यामध्ये यूएएन क्रमांकासोबत केवायसी डिटेल्स लिंक केल्या जातात. सध्या केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कंपनीची मंजुरी आवश्यक असते. एम्पलॉयलरने मंजुरी दिल्यानंतर केवायसी प्रक्रिया सध्या पूर्ण होते. आता ईपीएफओकडून ३.० अंतर्गत सेल्फ अटेस्टेशन फॅसिलिट सुविधा उपलब्ध झाल्यानंतर केवयासी प्रक्रिया पूर्ण करणे सोपे होणार आहे. नवी प्रक्रिया सुरु झाल्यानंतर खातेदारांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. काही वेळा कंपन्या बंद झाल्यानं खातेदारांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येत नसे. त्यामुळे नव्या सुविधेमुळे कागदोपत्री प्रक्रिया कमी होईल. यामुळे ईपीएफचे क्लेम फेटाळले जातात त्याचे प्रमाण देखील कमी होईल.

ईपीएफओ ३.० लाँच करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामध्ये ही सुविधा सुरु केली जाणार आहे. ईपीएफओ त्यांच्या आयटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये पूर्णपणे सुधारणा करणार आहे. एम्पलॉयमेंट लिंक्ड स्कीम्स लागू झाल्यानंतर ईपीएफओवरील कामाचा बोजा वाढणार आहे. तो ३.० लाँच झाल्यानंतर कमी होणार आहे. ईएलआय लागू झाल्यानंतर ईपीएफओ खातेदारांची संख्या १० कोटी रुपयांवर जाणार आहे. त्यामुळं आयटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा झाल्यास ईपीएफओकडून सदस्यांना चांगल्या सेवा दिल्या जाऊ शकतात.

क्लेमशिवाय पीएफ रक्कम काढता येणार
श्रम आणि रोजगार मंत्रालय २०२५ च्या अखेरपर्यंत ईपीएफओ ३.० लाँच गेले जाणार आहे. २०२५-२६ मध्ये त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. ईपीएफओ ३.० मध्ये बँकांसोबत मिळून एक सुविधा तयार करण्याबाबत विचार केला जात आहे. ज्यामध्ये ईपीएफ सबस्क्रायबर्स एका मर्यादेपर्यंत त्यांच्या कॉरपसमधून फंड काढू शकतात. साधारणपणे ती ५० टक्क्यांपर्यंत असू शकते. त्यासाठी ईपीएफओकडे क्लेम करण्याची आवश्यकता नसेल. श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी ईपीएफओ असा एक प्लॅटफॉर्म तयार करत आहे, ज्यावरुन कर्मचारी कोणत्याही अडचणीशिवाय पीएफ खात्यातून रक्कम काढू शकतील असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad