वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात आज झालेल्या लोकशाही दिनात रविंद्र कामतेकर यांनी अभ्युदयनगर येथील सुरुची सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या गच्चीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामाबाबत अनेकदा सूचित केले तरी एमआरटीपी अॅक्ट प्रमाणे कारवाई होत नसल्याबाबत अर्ज केला. सदरील अनधिकृत बांधकाम हे इमारतीस धोकादायक ठरू शकते अशी भीती कामतेकर यांनी व्यक्त केली. बोरीकर यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना इमारतीचे सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्याचे निर्देशित केले. तसेच सदर अहवाल मुंबई मंडळाच्या अतिक्रमण निर्मूलन कक्षाकडे पाठवून अतिक्रमण निष्कासनाबाबत एक महिन्याच्या आत कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी मुंबई मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तसेच रूपेश घाडी यांनी सन २०१८ मध्ये म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत जाहीर सोडतीत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत शिरढोण (ता. कल्याण) गृहनिर्माण प्रकल्पात विजेते ठरलेल्या सदनिकेचा ताबा मिळाला नसल्याबाबत अर्ज केला. याबाबत बोरीकर यांनी कोंकण मंडळाच्या मुख्य अधिकारी यांचे कडे चौकशी केली असता प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत संबंधित अर्जदार यांची सबसिडी देण्यासाठी पीएमवाय योजनेच्या पोर्टलवर पडताळणी होत नसल्याने सदर विलंब झाला असल्याचा निर्वाळा केला. पडताळणी झाली असल्यामुळे सदर अर्जदार यांना सदनिकेचा ताबा आजच द्यावा, असे निर्देश बोरीकर यांनी कोकण मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
लोकशाही दिनात म्हाडा मुंबई मंडळ व कोकण मंडळाशी संबंधित प्रत्येकी ०२ असे एकूण ०४ अर्ज प्राप्त झाले. म्हाडातर्फे आतापर्यंत झालेल्या ०७ लोकशाही दिनात ८१ प्राप्त अर्जांपैकी ७५ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment