सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा नवीन तारीख, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 January 2025

सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा नवीन तारीख, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर


नवी दिल्ली/ मुंबई - मुंबईसह महाराष्ट्रातील महापालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद यांच्या निवडणुका गेल्या तीन ते चार वर्षात झालेल्या नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र आजही या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली नसल्याने पुढील तारीख देण्यात आली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. (local body elections postponed)(BMC Elections)

सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात न्यायालयात धाव घेतली आहे. ओबीसी आरक्षण असो की नसो पण निवडणुका व्हाव्यात अशी मागणी या याचिकाकर्त्यांची आहे. सुप्रीम कोर्टामध्ये आज (28 जानेवारी) राज्यासाठी महत्त्वाची असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आणि ओबीसी आरक्षण यावर सुनावणी पार पडणार होती. 23 व्या नंबरवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व ओबीसी आरक्षण यांच्यातील याचिकेवर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र सुप्रीम कोर्टाकडून याप्रकरणी नवी तारीख दिली असून पुढील सुनावणी 25 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका या लांबणीवर पडल्या आहेत.

राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. राज्य सरकार म्हणून न्यायालयात बाजू मांडताना सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरात लवकर अंतिम सुनावणी करावी अशी विनंती असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले होते. मात्र आज पुन्हा पुढील तारीख दिल्याने निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad