महायुती सरकारच्या काळातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली प्रसिद्ध झाली आहे. अनेक महिलांनी त्यासाठी अर्ज केले असून, त्याचे पैसेही खात्यात आले आहेत. असे असताना आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला राज्य सरकारच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही. या संदर्भात राज्य सरकारने आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे सध्या लाभ घेणाऱ्या 25 टक्के महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे दरमहा सरकारचे 900 कोटी रुपये वाचू शकतील, असं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आता इनकम टॅक्स भरणाऱ्या कुटुंंबियांन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यासोबतच पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनाही कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे आता महिलांनाच या संदर्भात निर्णय घ्यावा लागणार असल्याचं म्हटलं आहे.
याशिवाय संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांनाही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती आहे. या योजनेंतर्गत तब्बल 25 लाख महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे. तर नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या 84 लाख महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.
मागील महायुती सरकारच्या काळातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चांगली प्रसिद्ध झाली आहे. अनेक महिलांनी त्यासाठी अर्ज केले असून, त्याचे पैसेही खात्यात आले आहेत. असे असताना आता राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्चात वाढ झाल्यामुळे राज्याची राजकोषीय तूट 2 लाख कोटींच्या पुढे गेली आहे. राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याची चिंताही व्यक्त करण्यात आली.
2024 च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणलेली महायुती सरकारची लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे महाराष्ट्रात पुन्हा भाजप-महायुतीची सत्ता आली. मात्र, यासोबतच या योजनेचे दुष्परिणामही समोर येत आहेत. उत्पन्नाच्या तुलनेत खर्चात वाढ झाल्यामुळे राज्याची राजकोषीय तूट 2 लाख कोटींच्या पुढे गेली आहे. राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे, अशी चिंता व्यक्त करत कॅगने सरकारला इशारा दिला आहे.

No comments:
Post a Comment