मुंबई - मुंबईतल्या ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील घणसोली परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथे दोन जणांनी एका पोलिस कर्मचा-याची धावत्या लोकलमध्ये हत्या केली आहे. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी हत्येनंतर संबंधित पोलिस कर्मचा-याचा मृतदेह समोरून येणा-या धावत्या लोकलसमोर फेकला. हा अपघात भासावा म्हणून आरोपींनी असे केले होते. मात्र मृत पोलिसाच्या गळ्याभोवती व्रण आढळून आल्यानंतर या प्रकरणाचे गूढ उलगडले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू केला आहे. विजय रमेश चव्हाण असे हत्या झालेल्या ४२ वर्षीय पोलिस कर्मचा-याचे नाव असून ते पनवेल रेल्वे पोलिस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून काम करतात. घटनेच्या दिवशी मंगळवारी चव्हाण यांची साप्ताहिक सुट्टी होती. बुधवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास चव्हाण यांचा मृतदेह घणसोली ते रबाळे रेल्वे स्टेशनच्या मध्ये आढळून आला होता. आरोपींनी ठाण्याहून वाशीच्या दिशेने जाणा-या ट्रेनसमोर चव्हाण यांचा मृतदेह फेकून दिला होता.
No comments:
Post a Comment