मुंबई - परभणी प्रकरणात पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या उच्च शिक्षित सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने सरकारने दिलेली मदत नाकारली आहे. त्याचबरोबर विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना सरकारने कुठलीही मदत दिली नाही. त्यामुळे वाकोडे यांच्या कुटुंबीयांना 50 हजारांची मदत देण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. समाजानेही पुढे येऊन या कुटुंबीयांना मदत करण्याचे आवाहन देखील आंबेडकर यांनी केले आहे.
सर्व फुले-शाहू-आंबेडकरी जनतेला ज्यांना शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला मदत करायची आहे, त्यांनी सोमनाथच्या मातोश्री विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी यांच्या बँक खात्यात मदत जमा करण्याचे आवाहनही ॲड. आंबेडकरांनी केले आहे.
No comments:
Post a Comment