अमृतसर मधील डॉ. आंबेडकर पुतळा विटंबनेचा तीव्र निषेध - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 January 2025

अमृतसर मधील डॉ. आंबेडकर पुतळा विटंबनेचा तीव्र निषेध - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

 

मुंबई - पंजाब अमृसर येथील सुवर्णमंदिर परिसराजवळ उभारण्यात आलेल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करीत असून या पुतळा विटंबनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमृतसरमधील पुतळा विटंबनेचा प्रकार अत्यंत दुःखद संतापजनक असून या विटंबनेचा तीव्र निषेध करण्यासाठी पंजाब आणि महाराष्ट्रातही रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन करावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे.

अमृतसर मधील डॉ. आंबेडकर पुतळा विटंबनेच्या निषेधार्ह घटनेस पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान सरकार जबाबदार आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे; महापुरुषांच्या पुतळ्यांचे रक्षण करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यात भगवंत मान अपयशी ठरले आहेत. पुतळा विटंबना करणाऱ्या आरोपीला अटक केली असली तरी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या पुतळा विटंबना प्रकरणा मागे कुणाचा हात आहे, कुणाचा कुटील डाव आहे, कोण सूत्रधार आहे, हे शोधून काढण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. पुतळा विटंबना करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी आठवले यांनी केली. 

अमृतसर मधील पुतळा विटंबना झालेल्या घटनास्थळाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले 29 जानेवारी रोजी भेट देणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाने जाहिर केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad