मुंबई - अंधेरी पश्चिम येथील ओबेरॉय कॉम्प्लेक्स येथील घरात काल (6 जानेवारी) रात्रीच्या सुमारास आग लागली. या आगीत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी पश्चिम येथे ओबेरॉय कॉम्प्लेक्स, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, स्काय पान बिल्डिंग ही 13 मजली इमारत आहे. या इमारतीच्या 11 मजल्यावरील घरात काल रात्री 10 च्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि पालिका अधिकारी घटनस्थळी पोहचले. आगीच्या धुरामुळे श्र्वसनाला त्रास होणाऱ्या दोन जखमींना जवळच्या कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी राहुल मिश्रा वय 75 यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. तर रौनक मिश्रा वय 38 याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या प्रकृतीची माहिती डॉक्टरांनी जाहीर केलेली नाही. आगीमध्ये घरामधील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक सामान, घरातील सामान जळून खाक झाले आहे. ही आग कशी लागली याची चौकशी अग्निशमन दल आणि पोलिसांकडून केली जात आहे.
No comments:
Post a Comment