एसटीतील इलेक्ट्रिक बस प्रकल्प तोट्याच्या खाईत लोटणारा - श्रीरंग बरगे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 January 2025

एसटीतील इलेक्ट्रिक बस प्रकल्प तोट्याच्या खाईत लोटणारा - श्रीरंग बरगे


मुंबई - भाडे करारा अंतर्गत एसटीत सुरू असलेला इलेक्ट्रिक बस प्रकल्प दिवसेंदिवस घाट्यात चालला असून अगोदरच आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीला अजून तोट्याच्या खाईत लोटणाऱ्या या प्रकल्पाचा एखादी तज्ञ समिती नेमून अभ्यास करून या प्रकल्पाचा फेरविचार करण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केले आहे.

इलेक्ट्रिक बस प्रकल्पात एसटीचे सरासरी एका किलोमिटर मागे २० रुपये इतके नुकसान होत असून सद्या या प्रकल्पा अंतर्गत एकूण १६८ बस सुरु आहेत. भविष्यात येणाऱ्या एकूण सर्व ५१५० बस पूर्णपणे एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या व करारात ठरल्या प्रमाणे या प्रकल्पातील बस मार्गावर चालल्या नाहीत तरी त्याना प्रती दीन प्रती बस ठरलेली ३२५ किलो मिटरची हमी रक्कम द्यावी लागेल. ५१५० बसेस सरासरी १५.४५ लाख किमी अंतर चालल्या किंवा नाही चालल्या तरी किमान प्रती दीन प्रती बस प्रती किलोमिटर २० रुपये इतका तोटा होऊन सुमारे ३ कोटी २५ लाख रुपये इतका खर्च होईल व तेव्हढाच तोटा सहन करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे महिन्याला सुमारे १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा सहन करावा लागणार असून वर्षाला सुमारे एक हजार कोटी रुपये पेक्षा जास्त तोटा सहन करावा लागणार आहे. त्यामुळे आता ज्या गाड्या सुरू आहेत. त्याचा एकंदर अभ्यास करून फेरविचार करण्याची गरज असून यापुढे सुद्धा हा प्रकल्प चालवायचा असेल किंवा रद्द करायचा असेल तर एखादी अभ्यास समिती नेमण्याची गरज असून भाडे तत्वावर बस पुरविणाऱ्या कंत्राटदार कंपन्यांनी इतर शासकीय उपक्रमामध्ये किंवा इतर राज्यांमध्ये काय दर निश्चित केले आहेत. तिथे हे दर का कमी आहेत?यावर सुद्धा अभ्यास केला पाहिजे असेही बरगे यांनी म्हटले आहे.

नव्याने येणाऱ्या १३१० भाडे तत्वावरील बस कंत्राटाच्या निविदेत हेराफेरी झाली व ऐनवेळी नियम व अटी विशिष्ट कंत्राटदारांना फायद्याच्या ठरतील अशाच पद्धतीने टाकन्यात आल्याने शंका निर्माण झाली. एसटी महामंडळाचे भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हस्तक्षेप करून सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारच्या परिवहन मंत्रालयाला दिले असून त्याच धर्तीवर इलेक्ट्रिक बस प्रकल्पात  सुद्धा भविष्यात होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारकडून चौकशी करण्यात यावी. अगोदरच आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीला तोट्यात खाईत घालणारा हा प्रकल्प पुढे सुरू ठेवायचा का? या बाबतीत फेरविचार व्हावा. असेही बरगे यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad