मुंबई - अनाथांना स्वतःचे घर घेता यावे म्हणून म्हाडाच्या घरांमध्ये आरक्षण ठेवले जाईल तसेच बालसुधार गृह आणि अनाथ आश्रमात मुलामुलींच्या संगोपनाची वयोमर्यादा वाढवली जाईल अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली. तर अनाथांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सभापतीपदाचा योग्य वापर करू अशी ग्वाही विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली. (Reservation for orphans in MHADA homes) (Age limit for care in orphanages will be increased)
अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या तर्पण पुरस्काराचे (Tarpan Awards) वितरण विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे आणि महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या उपस्थितीत तर्पण फाऊंडेशनचे (Tarpan Foundation) अध्यक्ष आमदार श्रीकांत भारतीय यांच्या उपस्थितीत मुंबई येथे झाले. त्यावेळी बोलताना आदित्य तटकरे आणि राम शिंदे बोलत होते.
आदित्य तटकरे म्हणाल्या की, 2018 मध्ये अनाथ मुलांना 1 टक्का आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज या आरक्षणामुळे 500 हून अधिक मुलांना शासकीय नोकरी देवू शकलो आहोत. अनाथ मुलांना म्हाडाच्या सदनिकांमध्ये 1 टक्का आरक्षण देण्याचा तसेच बालसुधार गृह आणि अनाथ मुलांचे संगोपन करण्याची वयोमर्यादा 18 वर्षे आहे. ही वयोमर्यादा 21 वर्षापर्यंत वाढवण्याचा विधेयक आणण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे निर्णय लवकरच घेवू.
राम शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनाथांना 1 टक्का आरक्षण लागू केले आहे. याचा फायदा घेवून चांगले विद्यार्थी घडले पाहिजेत. अनाथ मुलांसाठी तर्पण फाउंडेशनचे काम गौरवपूर्ण आहे. तर्पणच्या कार्यामागे राज्य सरकारने भक्कम पाठीशी उभे राहिले पाहिजे. मी सभापती असताना अनाथांचे प्रश्न सोडवताना, योजना आणि कायदे बनवताना त्याला न्याय देवू.
श्रीकांत भारतीय म्हणाले की, 18 वर्षानंतर बालगृहामधून बाहेर पडणाऱ्या मुलामुलींसाठी तर्पण फाऊंडेशन ही संस्था काम करते. गेल्या 5 वर्षांत या संस्थेने 1261 मुलांना विविध प्रकारचे सहाय्य केले आहे. तर्पणच्या प्रयत्नामुळे अनाथ मुलांना 1 टक्के आरक्षण मिळाले आहे. अनाथ मुलींना माहेर नसते. त्यांना माहेरची कमतरता भासू नये म्हणून पुढील 1 वर्षात पुण्यात अनाथ मुलींसाठी एक माहेरवासीन सदन बनवले जाईल. अनाथांना रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण केला जाईल.
यांचा पुरस्काराने सन्मान -
तर्पण फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा तर्पण युवा पुरस्कार यंदा सनाथ वेलफेअर फाऊंडेशनच्या संस्थापिका गायत्री पाठक, स्नेहवनचे संस्थापक अशोक देशमाने, श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृहाच्या अध्यक्षा मंगलताई वाघ यांना विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे हस्ते देण्यात आला. यावेळी विशेष अतिथी म्हणून वोक्हार्ट लिमिटेडचे कार्यकारी संचालक डॉ. हुजैफा खोरेकीवाला, कोहिनूर ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, इस्कॉनचे प्रवक्ते नित्यानंद चरण दास आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्काराचे चौथे वर्ष -
अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या तर्पण फाऊंडेशनतर्फे तरुणाईच्या अद्वितीय यशाचा व योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांचा गुणगौरव करून त्यांना प्रेरणा देण्यासाठी दरवर्षी ‘तर्पण युवा पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. यंदाचे हे चौथे वर्ष आहे.
No comments:
Post a Comment