मुंबई - मुंबई महापालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका राजूल पटेल यांच्यासह मुंबई, नाशिक, कोल्हापूर, सांगली तसेच जळगाव जिल्ह्यातील उबाठा गटाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. राजुल पटेल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का दिल्याची चर्चा आहे. (Rajul Patel joins Shiv Sena)
धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून ठाण्यातील त्यांचे समाधीस्थान असलेल्या शक्ती स्थळावर हा पक्षप्रवेश संपन्न झाला. यावेळी राजूल पटेल यांच्यासह विलेपार्ले येथील शाखाप्रमुख सुनील भागडे, वरळीतील सुरेश कोठेकर आणि रोशन पावसकर यांच्यासह ४० पदाधिकारी आणि ५० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवाजी नगर, मानखुर्द येथील कार्यकर्ते तसेच उत्तर मध्य मुंबईमधील अशोक लोखंडे यांच्यासह २० पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्याचबरोबर मीरा भाईंदर महापालिकाचे माजी उपमहापौर प्रवीण पाटील, जयंती पाटील, अरविंद ठाकूर, शिवशंकर तिवारी यांच्यासह माजी नगरसेवकांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री दादाजी भुसे, आमदार तुकाराम काते, आमदार मुरजी पटेल, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राम रेपाळे, ठाणे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, माजी आमदार रुपेश म्हात्रे, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना उपनेते विजय करंजकर, सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, माजी नगरसेविका हर्षदा गिरकर, योगेश म्हस्के तसेच शिवसेनेचे ठाण्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोण आहेत राजुल पटेल -
राजुल पटेल या शिवसेनेच्या माजी नगरसेविका म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेत कार्यरत होत्या, त्याशिवाय त्यांनी 2019 साली विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली होती. ठाकरेंच्या शिवसेना पक्षातील जुन्या महिला शिवसैनिक म्हणून राजुल पटेल यांची ओळख आहे. त्यामुळे, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यास ठाकरेंच्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, वर्सोवा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असून या मतदारसंघात राजूल पटेल यांचं राजकीय वजन आहे. मात्र, विधानसभा निवडणुकांपासून त्या नाराज असल्याने महापालिका निवडणुकांचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न त्यांनी केल्याचं बोललं जात आहे.
No comments:
Post a Comment