मुंबई - अमृतसरमधील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड करुन विटंबना केल्याचा झालेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. त्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाचे उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्या नेतृत्वात बोरीवली येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. पंजाबचे आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा ही यावेळी निषेध करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आज बोरीवलीत निषेध आंदोलन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर झालेला हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. प्रजासत्ताकदिनी देशात संविधान लागु झाले. त्याच दिवशी संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना आणि संविधानाच्या प्रतिची विटंबना करण्याचा प्रकार हा देशाचा अपमान आहे. त्यामुळे अमृतसरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांनी यावेळी रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते हरिहर यादव, दिलीप व्हावले आदि मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment