मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार-कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी संघटना म्युनिसिपल मजदूर युनियन, मुंबईच्या नेतृत्वाखाली (शुक्रवार दि. १७ जानेवारी २०२५ रोजी) महाराष्ट्रातील हजारो कामगार-कर्मचाऱ्यांचे लाडपागे समितीच्या (Ladpage Committee) शिफारशीनुसार वारसाहक्क नोकरी अबाधित ठेवण्यासाठी सुमारे दीड/दोन वर्षे अविरत लढणारे महाराष्ट्र राज्य महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद कामगार कर्मचारी फेडरेशनचे कामगार नेते व उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठासमोर प्रभावी व अभ्यासपूर्ण बाजू मांडणारे ज्येष्ठ विधितज्ञ वकिल यांचा गौरव व सन्मान करण्यात आला.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ, भोईवाडा, परळ, मुंबई येथील सभागृहात या विशाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर भव्य विजयी मेळावा अतिशय आनंदात, जल्लोषात व वाजगतगात संपन्न झाला.
संघटनेचे लढाऊ कामगार नेते साथी जॉर्ज फर्नाडिस व साथी शरद राव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून, दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनचे कार्याध्यक्ष व म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, स्वागताध्यक्ष संघटनेचे सरचिटणीस वामन कविस्कर, प्रस्तावना संघटनेचे कार्याध्यक्ष यशवंतराव देसाई यांनी केली. सदर मेळाव्यामध्ये अॅड्. हरीश बाली (वरिष्ठ विधितज्ञ) आणि अॅड्. बळीराम बी. शिंदे (ज्येष्ठ कायदेतज्ञ) विशेष अतिथी म्हणुन लाभले होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र राज्य महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद कामगार कर्मबारी फेडरेशनचे प्रवक्ते गौतम खरात (संभाजीनगर), सरचिटणीस अॅड्. सुरेश ठाकूर (नवी मुंबई), अनिल जाधव (पनवेल), संतोष पवार (उरण), मनिषा काकड यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. हिंद मजदूर सभेचे सरचिटणीस संजय वढावकर व राज्यातील प्रमुख कामगार नेते त्याचप्रमाणे म्युनिसिपल मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष यशवंतराव देसाई, कोषाध्यक्ष शरद राघव, म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष इंजि. रमेश भुतेकर-देशमुख उपस्थित होते. प्रमुख अतिथी व व प्रमुख पाहुणे यांनी विजयी मेळाव्यामध्ये उपस्थित हजारो कामगार-कर्मचाऱ्यांना आपल्या मार्गदर्शनपर भाषणात भविष्यात कामगार-कर्मचाऱ्यांसाठी संघटनेचे असलेले महत्व तसेच न्यायालयीन लढाई बरोबरच संघर्ष करणे व त्यासाठी कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये एकजुट असणे तेवढेच आवश्यक असल्याचे सांगितले.
या भव्य विजयी मेळाव्यास उपाध्यक्ष, संघटक, कार्यकारिणी सदस्य, कामगार, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने सहभाग नोंदवून मेळावा यशस्वी केला. सदर मेळाव्यामध्ये अतिथी व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव, सरचिटणीस वामन कविस्कर, कार्याध्यक्ष यशवंतराव देसाई, कोषाध्यक्ष शरद राघव, माजी कामगार अधिकारी सहदेव मोहिते यांनी केले तसेच सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी संघटनेचे उपाध्यक्ष, संघटक, सहा. सरचिटणीस, चिटणीस व पुर्णवेळ पादधिकारी, कार्यकर्ते व सदस्य यांनी प्रचंड मेहनत घेतली. तसेच सदर मेळाव्याचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन यशोदा पाटील यांनी केले.
Post Top Ad
18 January 2025
लाडपागे समितीच्या शिफारशीसाठी लढणाऱ्या म्युनिसिपल कामगार नेते, वकिलांचा गौरव
Tags
# मुंबई-महाराष्ट्र
Share This
About JPN NEWS
मुंबई-महाराष्ट्र
Tags
मुंबई-महाराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment