मुंबई (अजेयकुमार जाधव) -
मुलुंडकरांना (Mulundkar) चांगली आरोग्य सेवा, चांगले रस्ते, गार्डन, शौचालये आणि अद्ययावत अश्या सोयी सुविधा मिळवून देण्याचे काम केले आहे. येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत पुन्हा संधी मिळाल्यास मुलुंड पूर्व आणि पश्चिम येथे जाणाऱ्या नागरिकांना उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग उभारला जाईल असे प्रभाग क्रमांक 104 (Bmc word no. 104) चे माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे (Prakash Gangadhare) यांनी सांगितले.
कोण आहेत प्रकाश गंगाधरे -
मुंबई महानगरपालिकेच्या मुलुंड येथील प्रभाग क्रमांक 104 (Mulund) (BMC Ward no. 104) मधून भाजपाचे प्रकाश गंगाधरे (BJP Prakash Gangadhare) हे दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यांनी मुंबई महापालिकेच्या सुधार समिती दोन वेळा तर एकदा बेस्ट समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. (BMC Elections)
अद्ययावत रुग्णालयासाठी संघर्ष -
मुलुंड येथे एम टी अग्रवाल हे 25 ते 30 वर्षे जुने रुग्णालय आहे. हे रुग्णालय नूतनीकरण करून अद्ययावत करावे यासाठी प्रकाश गंगाधरे यांनी उपोषण केले होते. त्यांनी उपोषणाच्या माध्यमातून पालिका प्रशासनाचे लक्ष केंद्रित करून हे रुग्णालय 100 बेडचे रुग्णालय अद्ययावत अशा 470 बेडचे करून घेतले आहे. रुग्णालयात अद्ययावत असे ऑपरेशन थिएटर, ब्लड बँक आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. ज्याचा फायदा मुलुंडकरांना होत आहे.
अद्ययावत नाट्यगृह -
मुलुंड येथे सुप्रसिद्ध असे कालिदास नाट्यगृह आहे. या नाट्यगृहात अनेक कार्यक्रम होतात. प्रेक्षकांना चांगली सुविधा मिळावी म्हणून अद्ययावत असे कालिदास नाट्यगृह उभारण्यात आले आहे. लवकरच अद्ययावत अशा नाट्यगृहाचे लोकार्पण केले जाईल अशी माहिती गंगाधरे यांनी दिली.
चांगले रस्ते, गार्डन -
मुलुंड येथील एस एस वी रोड आहे. हा रोड मुलुंड चेक नाका पर्यंत जातो. या रस्त्यावर एक मदरसा होता. त्यामुळे ट्रॅफिक जाम होत असे. हा मदरसा इतर ठिकाणी हलवण्यात आला. त्यामुळे येथून प्रवास करणाऱ्या नागरिकांना, वाहन चालकांना दिलासा मिळाला. तांबे नगर येथील रहिवाशांना कब्रस्तान असल्याने वळसा मारून प्रवास करावा लागत होता. जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेवून कब्रस्तानची जागा ताब्यात घेवून त्यांना इतर ठिकाणी जागा देण्यात आली. त्यामुळे तांबे नगरमधील नागरिकांना फायदा झाला असे गंगाधरे यांनी सांगितले.
हे काम बाकी -
मुलुंड पूर्व आणि पश्चिम येथे जाणाऱ्या नागरिकांना उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग उभारण्याचे काम बाकी आहे. पक्षाने यंदाच्या महापालिका निवडणुकीत पुन्हा संधी दिल्यास मुलुंड येथील मिठागरापर्यंत उड्डाणपूल किंवा भुयारी मार्ग उभारला जाईल असे गंगाधरे यांनी सांगितले.
लोकांच्या संपर्कात असलेले नगरसेवक -
मी नेहमी नागरिकांच्या संपर्कात असतो. दिवसरात्र नागरिक मला कामानिमित्त भेटत असतात. दिवाळी पहाट, कोकण महोत्सव, विद्यार्थ्यांचा सत्कार, गणेश विसर्जनाच्या वेळी सोयी सुविधा आदी कार्यक्रमातून नेहमीच नागरिकांच्या संपर्कात असतो असे गंगाधरे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment