Ladaki Bahin Yojana - पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत मिळणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 January 2025

Ladaki Bahin Yojana - पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत मिळणार


मुंबई - राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात मंत्री परिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्य  शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून लाभ वितरीत करण्यास सुरुवात केली. त्यानुसार योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारीपर्यंत थेट लाभ हस्तंतरणाद्वरे (डी बी टी द्वारे) पात्र महिला लाभार्थ्यांना  हस्तांतरित करण्यात येणार आहे. यासाठी ३ हजार ६९० कोटी इतक्या रकमेला मंजुरी देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad