मुंबई - भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश गांगाधरे आणि मुलुंड सेवा संघ यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे यंदाही कोकण महोत्सव 2024-25 चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव मुलुंड तालुका क्रीडा संकुल, नीलम नगर फेज 2 येथे 28 डिसेंबर ते 12 जानेवारी दरम्यान सुरू आहे. सायंकाळी 6.30 ते रात्रौ 10 पर्यंत सुरू असलेल्या या महोत्सवाला नागरिकांचा उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे.
मुलुंड परिसरात राहणाऱ्या कोकणवासीयांसाठी कोकणची माती, नाती, आणि संस्कृती जपण्यासाठी तसेच कोकणातील उद्योजक, बचत गट, व कोकणी पदार्थांच्या उत्पादकांसाठी बाजारपेठ तयार करण्याचा एक सांस्कृतिक सोहळा म्हणून "कोकण महोत्सव २०२४-२५" आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात कोकणातील कला, लोककला, आणि संस्कृतीचा अनोखा उत्सव साजरा केला जात आहे. २८ डिसेंबर २०२४ ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत संध्याकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत मुलुंड तालुका क्रीडा संकुल, वामनराव मुरांजन शाळेजवळ, मुलुंड (पूर्व), मुंबई-८१ येथे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. आपल्या कुटुंबासह या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी केले आहे.
काय खास आहे कोकण महोत्सवात -
भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश गांगाधरे आणि मुलुंड सेवा संघ यांच्या वतीने गेले 5 ते 6 वर्ष कोकण महोत्सव साजरा केला जातो. त्यातून कोकणची संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जातो. या महोत्सवात कोकणी, मालवणी पदार्थ, चिकन, मच्छी पासून दिल्लीच्या फेमस कुल्फीपर्यंत स्वाद चाखता येतो. येथे बच्चे कंपनीसाठी राईड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. महोत्सवाला येणाऱ्या लोकांच्या मनोरंजनासाठी रोज महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असतो.
No comments:
Post a Comment