भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश गांगाधरे आणि मुलुंड सेवा संघ यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे यंदाही कोकण महोत्सव 2024-25 चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव मुलुंड तालुका क्रीडा संकुल, नीलम नगर फेज 2 येथे 28 डिसेंबर ते 12 जानेवारी दरम्यान सुरू आहे. सायंकाळी 6.30 ते रात्रौ 10 पर्यंत सुरू असलेल्या या महोत्सवाला नागरिकांचा उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत आहे.
कोकण महोत्सवात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला स्वता प्रकाश गांगाधरे भाजप सदस्य नोंदणीसाठी मोबाईल क्रमांक 8800002024 वर मिस कॉल देण्याचे आवाहन करत आहेत. महोत्सवात येणारा मुलुंडकर आणि इतर नागरिक भाजपचे सदस्य होत आहेत. यामुळे आपोआप भाजप सदस्य संख्या वाढत आहे. गंगाधरे यांनी सदस्य नोंदणी करण्याच्या अनोख्या मोहिमेचे कौतुक केले जात आहे.
काय आहे कोकण महोत्सव -
भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश गांगाधरे आणि मुलुंड सेवा संघ यांच्या वतीने गेले 5 ते 6 वर्ष कोकण महोत्सव साजरा केला जातो. त्यातून कोकणची संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला जातो. या महोत्सवात कोकणी, मालवणी पदार्थ, चिकन, मच्छी पासून दिल्लीच्या फेमस कुल्फीपर्यंत स्वाद चाखता येतो. येथे बच्चे कंपनीसाठी राईड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. महोत्सवाला येणाऱ्या लोकांच्या मनोरंजनासाठी रोज महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असतो.
No comments:
Post a Comment